महत्त्वाच्या सूचना:

ऑनलाइन आवेदन अर्ज भरण्यासाठी महत्त्वाच्या सूचना

महत्त्वाच्या मूळ सूचना

(फॉर्म सबमीट होत नसल्यास , पुन्हा एकदा OTP साठीचे बटन क्लीक करा . नवीन आलेला OTP फॉर्ममध्ये भरून ‘ SUBMIT FORM ‘ बटन क्लीक करा.)

1. तरुण तेजांकित पुरस्कारांसाठी आवेदन अर्ज १२/०२/२०२३ रोजी रात्री १२:०० वा. पर्यंत उपलब्ध असेल. त्यानंतर नामांकने बंद करण्यात येतील आणि अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

2. तपशीलवार सूचना खाली देण्यात आल्या आहेत. अर्जदारांनी नामांकने भरण्यापूर्वी किंवा त्यांचे पर्याय निवडण्यापूर्वी दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. ऑनलाइन अर्ज भरताना अर्जदारांनी दिलेला सर्व तपशील पूर्ण भरावा. अनिवार्य तपशील * ह्या चिन्हाने दाखविला आहे.

3. नामांकन अर्ज भरण्यापूर्वी अर्जदारांना विनंती करण्यात येते की त्यांनी fields या पानावर वर उपलब्ध असलेले पात्रता निकष काळजीपूर्वक वाचावे.

4. अर्जदारांना सल्ला देण्यात येतो की त्यांनी सर्व संबंधित कागदपत्रे (शैक्षणिक कागदपत्रे आणि डिजिटल छायाचित्रे अर्ज भरण्यापूर्वी तयार ठेवावीत. १०० केबीपेक्षा जास्त नसलेले छायाचित्र जेपीजी/जेपीईजी/पीएनजी/टीआयफ स्वरूपामध्ये अपलोड करण्यात यावे.

5. ऑनलाइन आवेदन अर्ज दोन प्रकारांमध्ये आहे: एक, ज्यामध्ये अर्जदार मॅन्युअली माहिती भरू शकतो आणि दुसरा, ज्यामध्ये अर्जदार ड्रॉप डाऊन बॉक्समधून पर्याय निवडू शकतो.

6. अर्जदारांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी पानाच्या सर्वात शेवटी असलेल्या घोषणापत्राचा मजकूर काळजीपूर्वक वाचावा आणि त्यानुसार त्याने/ तिने घोषणापत्रामध्ये असणारया मजकुरासमोर योग्य त्या ठिकाणी टिक करावे.

7. अर्ज सादर केल्यानंतर यंत्रणेद्वारे अर्जाचा संदर्भ क्रमांक देण्यात येईल. अर्जदारांना सल्ला देण्यात येतो की आगामी पत्रव्यवहारासाठी अर्जाचा संदर्भ क्रमांक नोंदवून ठेवावा.

तपशीलवार सूचना

1. अर्जदाराचे नाव: खालीलपैकी ओळखपत्रांवर जसे नाव आहे त्यानुसार

i. आधार कार्ड

ii. पॅन कार्ड

iii. वोटर आयडी

iv. पासपोर्ट

v. मोटर वाहन कायदा, १९८८ अंतर्गत परवाना प्राधिकरणाद्वारे पारित करण्यात आलेले ड्रायव्हिंग लायसेन्स.

त्याच्या/ तिच्या नावामध्ये असणारया स्पेलिंगमध्ये जर काही चूक असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. उमेदवारांना विनंती करण्यात येते की श्री.,श्रीमती, कुमार, कुमारी, डॉ. पुराव्यांसह वगैरे नमूद करू नये.

2. लिंग: ड्रॉप डाऊन यादीमधील संबंधित पर्यायांवर अर्जदारांनी योग्य त्या ठिकाणी टिक करावे.

3. जन्म दिनांक: कॅलेंडर दिसण्यासाठीयोग्य त्या ठिकाणी क्लिक करावे. उपरोक्त नमूद पुराव्यानुसार निवडून टिक करावे.

4. पत्रव्यवहाराचा पत्ता: उमेदवारांनी शहराच्या किंवा जिल्ह्याच्या नावासह, राज्याचे नाव, पिन/झिप कोड आणि देशाच्या नावासह अर्जदाराने त्याचा पूर्ण पत्ता लिहावा.

5. शैक्षणिक पात्रता: अर्जदारांनी त्याच्या/ तिच्या शैक्षणिक पात्रतेचा पूर्ण तपशील भरावा. विद्यापीठाच्या किंवा शैक्षणिक मंडळाच्या किंवा प्रमाणीकरण / पुरस्कार प्राधिकरणाच्या नावासह पदवीपर्यंतच्या सर्वोच्च शैक्षणिक पात्रतेची माहिती भरावी. जर अर्जदाराने पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले असेल तर त्याने/ तिने पात्रतेचे पूर्ण नाव आणि संबंधित विद्यापीठाचे किंवा शैक्षणिक मंडळाच्या किंवा प्रमाणीकरण / पुरस्कार प्राधिकरणाचे नाव भरावे.

6. श्रेणी: नामांकन अर्ज वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागण्यात आला आहे. उपलब्ध असणारया योग्य पर्यायांमधून अर्जदाराने योग्य त्या पर्यायाची निवड करावयाची आहे.

7. कामाचे स्वरूप: अर्जदाराने तो/ ती काम करत असलेल्या संस्थेचे नाव, हुद्दा आणि जर असल्यास संकेतस्थळाचे नाव नमूद करावे.

8. संपर्काचा तपशील: १० अंकी मोबाइल आणि ई-मेल आयडी नमूद करणे गरजेचे आहे.  +९१ म्हणजे + ९१ xxxxxxx८६७ सारखा वापर करू नये.

9. छायाचित्र अपलोड: अर्जदाराने त्याचेसध्याचेछायाचित्र अपलोड करावे. छायाचित्र जेपीजी/जेपीईजी/पीएनजी/टीआयफ स्वरूपात अपलोड करावे जे १०० केबीपेक्षा जास्त नसावे. असा सल्ला देण्यात येत आहे की छायाचित्र ४५ एमएम उंच x ३५ एमएम रुंदीचे पांढरया / हलक्या पार्श्वभूमी असलेले असावे.)

10. एलिवेटर पीच: “लोकसत्ता तरुण तेजांकित २०२२“ करिता विचार होण्यासाठी ५०० शब्दांपेक्षा जास्त नसलेले कारण द्यावे.

11. महसूल पद्धती: फंडिंग, महसूल, विक्री, वाढीचा दर वगैरे तपशील (जर लागू असल्यास) त्याचा तपशील योग्य त्या ठिकाणी भरावा. सदर माहिती ५०० शब्दांपेक्षा जास्त नसावी.

12. कोणती विविधता आहे: ह्या भागामध्ये अर्जदाराने त्यांच्या डोमेन/ सेक्टर, समाज, देश आणि/ किंवा जगावर काय परिणाम झाला आहे याची माहिती ५०० शब्दांमध्ये द्यावी.

13. सध्याच्या प्रेससाठी लिंक्स: ह्यामध्ये दोन टॅब्ज असून त्यामधील एकामध्ये अर्जदाराला यूआरएलची नोंद करता येईल. आणि दुसरयामध्ये अर्जदाराला लेख वगैरे अपलोड करता येतील. ५०० केबीपेक्षा जास्त नसलेले केवळ एकच पीडीएफ अपलोड करता येईल. जर एकापेक्षा जास्त असल्यास अर्जदाराने ते एकत्रित करून अपलोड करावे.

14. पुरस्कार:  अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अर्जदाराला मागील एक वर्षामध्ये मिळालेल्या पुरस्कारांची यादी अपलोड करावी. त्यासाठी पुरस्कार स्वीकारतानाचे छायाचित्र अपलोड करावे. केवळ एकच छायाचित्र जे ५०० केबी पेक्षा जास्त नसावे आणि पीडीएफ स्वरूपात अपलोड करण्यात यावे.

15. संदर्भ: अर्जदाराने ज्यांच्या सोबत काम केले आहे किंवा करत आहेत त्यांचे नाव, पत्ता, संस्था, नाव नाते आणि संपर्क क्र. आणि ई-मेल असा दोन संस्थांचा तपशील द्यावा. जर अर्जदाराकडे कोणतीही लेखी शिफारस असल्यास ती पीडीएफ स्वरूपात ५०० केबीपेक्षा जास्त नसावी. जर एकापेक्षा जास्त असल्यास अर्जदाराने ते एकत्रित करून अपलोड करावे.

*कृपया लक्षात घ्या की नामनिर्देशनांचे परीक्षण प्राथमिकपणे अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारावर केले जाईल. म्हणून, सर्व अर्जदारांना विनंती करण्यात येत आहे कि त्यांनी सर्व दृष्टिकोनांनी पुरेशी आणि अचूक माहिती द्यावी.

Important Instructions to fill Online Application Form

Basic Instructions

(If form is not getting submitted, please click on ‘CLICK HERE TO SEND OTP’. Then fill the new OTP in the form & click ‘SUBMIT FORM’ button)

 1. The nomination form for Loksatta Tarun Tejankit 2022 will remain active up to 23:59 on 12/02/2023 after which the nominations will be closed and no further applications will be accepted.
 2. Detailed instructions are given below. Applicant should read the instructions carefully before nominating or selecting its options. Applicant should supply all the required details while filling up the online form. Mandatory fields are marked with * (asterisk) sign.
 3. Before filling up the form nominees are advised to go through the Eligibility Criteria document available here.
 4. Nominees are advised to keep all relevant documents (Educational Certificate etc.) and a digital photograph ready before starting with the form filling process. Images to be uploaded should be only in JPG/JPEG/PNG/TIF format of size not exceeding 100 kb.
 5. Fields in online application form are of two types – One, in which the applicant can enter the information manually, and another, in which the applicant can select one of the options from Drop Down box.
 6. Applicants are advised to go through the contents of the Declaration mentioned at the end of the page carefully and tick on the check box if he/she agrees with the contents of Declaration.
 7. After the submission of the form the system provides the Application Reference Number. Applicant is advised to note down the Application Reference Number future correspondence.

Detailed Instructions

 1. Name of Applicant: As it appears on any of the following identity proofs,
  1. Aadhaar Card
  2. PAN Card
  3. Voter ID Card
  4. Passport
  5. Driving License issued by the Licensing Authority under the Motor Vehicles Act, 1988

  Mismatch in spelling may disqualify his/her nomination. Candidates are requested to not use prefixes like Shri, Smt., Mrs., Kumari, Dr., etc.

 2. Gender: Nominee is required to click on the relevant option from the drop down list.
 3. Date of Birth: Click on the field for the calendar to appear, select date of birth from the calendar as recorded in any of the aforesaid proofs.
 4. Mailing & Permanent Address: Nominee needs to write complete address along with name of the City or District, name of the State, zip / pin code and Country, selecting from drop-down menu.
 5. Academic Details: Nominee needs to fill-in details of his / her educational qualification(s). Applicant should fill his/her highest educational qualification till graduation in this field along with name of the University or Education Board or Certifying / Awarding Authority. If applicant has completed post-graduation, he/she may fill-in name of the qualification and respective University or Certifying / Awarding Authority.
 6. Category: The nomination form has been segregated into multiple categories. The nominee needs to select relevant category amongst available options.
 7. Work description: Nominee is required to provide information regarding Organization he / she is working in, position held and  Organization’s web-portal (if any).
 8. Contact details: 10 digit mobile number and Email is required to be entered. Do not use prefix +91 as +91-XXXXXXX867
 9. Upload photograph: The nominee is required to upload the image of a recent Photograph. Images to be uploaded should be only in JPG/JPEG/PNG/TIF format of size not exceeding 100 kb. It is advised to upload image of photograph with size 45mm high x 35mm wide on white / light colour background).
 10. Elevator Pitch: Details as to why the nomination wants to be considered for “Loksatta Tarun Tejankit 2022”. Please do not exceed 500 characters.
 11. Targeted clients / recipients: Details on the approximate count of the individuals / societies being catered and/or benefitted along with their demographics, need and location. Please do not exceed 500 characters.
 12. Revenue Model: This section to include details on finances such as funding, revenue, sales, growth rate, etc (if applicable). Please do not exceed 500 characters.
 13. Making a difference: In this section, the nominee may explain about your impact on your domain / sector, community, country and/or the world. Please do not exceed 500 characters.
 14. Links to recent press: It has two tabs, one, in which the nominee can insert the URL, and another, in which the nominee can upload scanned copy of the article/s and/or posts. Only single attachment is allowed which should be in .pdf and not to exceed 500 Kb. In case of multiple article/s and post/s, the nominee may club it together and upload it as a single file.
 15. Award/s: The nominee may upload award certificates received during last one year from the last date of form submission, pertaining to the nomination. The nominee may attach any photographic evidence while receiving the award. Only single attachment is allowed which should be in .pdf and not to exceed 500 Kb.
 16.  References: Name, address, organization, title, relationship and contact Number & Email of two of the References with whom the applicant has worked / undertaken assignment / activity / research is to be provided here. If nominee has any written recommendation, he/she may upload in .pdf and size to be less than 500 Kb. In case of multiple recommendations, the nominee may club it together and upload it as a single file.

*Kindly note that nominations will be primarily judged and shortlisted on the basis of information provided in application form. All Applicants are, therefore, requested to submit adequate and precise information covering all aspects.