भविष्यानेही आशेने पहावे अशा ‘वर्तमानाचा’चा गौरव!

आताच्या पिढीविषयी ज्येष्ठांच्या प्रतिक्रिया ठरलेल्या असतात. “पूर्वीसारखं आता राहिलं नाही” आणि ही पिढी काही गंभीर नाही”.
तथ्य आहे या विधानांत?

नसावं. नक्कीच नसावं. कारण आजही अनेक प्रतिभावान तरुण गायन, वादन, नृत्य, अभिनय अशा अनेक क्षेत्रात नवनवी उंची गाठतात. आजही अनेक तरुण झपाटून जाऊन आपलं उद्योगांचं स्वप्न साकारत असतात.

आजही अनेक तरुण विज्ञानाच्या एखाद्या कूट प्रमेयाचं उत्तर शोधण्यात मग्न असतात. आजही अनेक तरुण आपल्या मातीतील चैतन्याच्या ध्यासात घाम गाळत असतात. आजही अनेक तरुण निसर्गाने नाकारलेल्या, टाकलेल्या, अन्याय केलेल्या पीडितांच्या भल्यासाठी जिवाचं रान करीत असतात आणि आजही तरुण आकाशाला गवसणी घालण्यासाठी झेप घेत असतात.
पण आज गरज असेल तर ती या तेजस्वी तरुणांच्या पाठीवर कौतुकाची एक थाप देण्याची.
त्याच उद्देशाने दै. लोकसत्ता पुन्हा एकदा घेऊन येत आहे एक ओजस्वी उपक्रम.

लोकसत्ता तरुण तेजांकित