काय आहे ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’?

महाराष्ट्रातील चाळिशीच्या आतल्या विविध क्षेत्रांतील तरुणांना ओळखून, त्यांच्या कार्याची महती लक्षात
घेऊन त्यांना गौरवावे हा यामागचा विचार. नव्या पिढीचे उद्योजक, संशोधक, कलावंत, समाजसेवक,
प्रशासक…अनेक मार्गांनी समाजात बदल घडविणारे.. अशा युवाशक्तीचा गौरव या पुरस्काराने केला जाणार आहे.

हे लखलखते हिरे पारखले आणि निवडले जातील ते अर्थातच नामवंतांच्या एका स्वतंत्र समितीकडून.
महाराष्ट्राला आपल्या कार्याने ललामभूत झालेल्या काही निवडक मान्यवर मातबरांच्या हस्ते एका भव्य
कार्यक्रमात त्या तेजांकितांचा खास गौरव केला जाईल.

हा गौरव, हा सत्कार म्हणजेच महाराष्ट्रातील जाणत्या जनांच्या वतीने ‘लोकसत्ता’ने आजच्या तरुणाईतील
सर्जनशीलतेला दिलेली एक खास दाद!