इच्छुक तेजांकितांसाठी निकष

३१ डिसेंबर २०२२ रोजी इच्छुक तेजांकिताचे वय ४० पेक्षा कमी असावे. म्हणजेच तो/ती १९८३ किंवा त्यानंतर जन्मलेले असावेत. अर्थातच याआधी जन्म झालेले यासाठी अर्ज करू शकणार नाहीत.

या पुरस्कारासाठी कोणत्याही विशिष्ट क्षेत्राची मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. पुरस्कारिवजेते कोणत्याही
क्षेत्रातील असू शकतील… उदाहरणार्थ –

उद्योग आणि व्यवसाय

अ) सेवा : वित्त सेवा, आरोग्य, आतिथ्य उद्योग, आयुर्विमा, माहिती-तंत्रज्ञान सेवा व्यवस्थापन, ऑनलाइन सेवा, पर्यटन, दूरसंपर्क, किरकोळ बाजार, मार्केटिंग-जाहिरात, क्रीडा व्यवस्थापन.

ब) उत्पादन : भांडवली वस्तूबाजार, ग्राहकबाजार, वाहन उद्योग, विमान वाहतूक, घरगुती उत्पादन निर्मिती, फर्निचर, क्रीडा साहित्य, बांधकाम व्यवसाय, पायाभूत सुविधा, ऊर्जा, अन्न व पेय, तंत्रज्ञान, औषध निर्मिती, तेलनिर्मिती आदी उद्योग.

कला आणि मनोरंजन

चित्रपटनिर्मिती, नृत्य, नाटय, साहित्य, विविध क्षेत्रांतील रचनाकार (डिझायनर्स), आर्किटेक्ट, वस्तुनिर्मिती, अभिनय, दिग्दर्शन, दूरिचत्रवाणी वाहिन्या, वृत्तपत्र, नभोवाणी, फाइन आर्ट आदी क्षेत्रं.

सामाजिक

समाजकार्य, अध्यापन/ज्ञानदान, समूह विकास ते सामाजिक उद्योजकता.

कायदा, धोरणे, राजकारण, प्रशासन

न्यायाधीश, वकील, कायदेतज्ज्ञ, मंत्री, राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी.

क्रीडा

विविध खेळांमध्ये प्रावीण्य मिळवलेले क्रीडापटू.

विज्ञान

मूलभूत विज्ञान, संशोधन व विकास क्षेत्र.

नव उद्यमी

उद्योग आणि व्यवसाय ज्यांना सुरु होऊन ५ किंवा त्यापेक्षा कमी वर्षे झाली असतील त्यांनी ‘नव उद्यमी’ या विभागात नामांकन द्यावे.